लेखणी
लेखणी
1 min
238
लेखणी माझा आधार
असते नेहमी सोबती
करिते सदाच सांत्वन
अश्रूंना माझ्या जपती
लेखणी जवळ असता
उलगडा होतो मनाचा
अलगद अक्षरे उतरती
भार कमी करे लोचनांचा
लेखणी माझी चालता
व्यक्त करते भावनांना
शब्दाची माळ गुंफित
मिळविते दोन जिवांना
या लेखणीस माझ्या
आहे फार तिखटधार
नसे तमा कुणाचीच
करते शब्दांचा प्रहार
लेखणी ही जीवनात
मोलाचे कार्य करते
समाजास दिशा देऊन
आधार स्तंभ बनते
