लेखणी
लेखणी
आज जरा निवांत होते म्हणून
आयुष्याचे पान जरा चाळत बसले
पाने हळूच उलटून पाहताना
आठवणींच्या झुल्यावर मी झुलले...
या पानांवर खूप काही लिहिलेले
अमाप चित्रे जीवनी रेखाटलेली
जीवन पन्नाशीचे हो आता झालेय
गत स्मृतीत मनी सारे उतरलेली...
स्मृतीपटलावर जरा विसावले मी
गतकालीन विश्वात जरा रमले
थोडी मी त्यात हरवूनच गेले
सुखदुःखाचा हिशोब लावत बसले...
शब्द काही सापडले नाहित हो
जीवनी सुख अमाप मिळालेय
पण दुःखतूनही व्
यवस्थित तरलेय
गुरूकृपेने मी त्यातून बाहेर पडलेय...
वेड्या मनाला आता समजावलेय
गतकालात झाले ते होवून गेले
आता वर्तमानातील बहारदार दिवसात
मनसोक्त जगायचे जे जगायचे राहिले...
दुःखाला सामोरी तर जात आहेच
आता सुखाला जरा कुरवळायचे
काही लोकांसाठी Who care म्हणून
आपण आपले उर्वरीत आयुष्य जगायचे...
ओलावले नयन माझे गतकाली जाताना
सुखावतील नयन भविष्य निरीक्षण करताना
लेखणी घेवून हाती कवितेत रमायचे
राहून गेलेले जगायचे ते रेखाटायचे...