STORYMIRROR

Sarika Musale

Others

3  

Sarika Musale

Others

लेक

लेक

1 min
218

लक्ष्मी सोनपावलांची

प्रकटे सदनी आनंद 

समृद्धीचा सुगंध 

अंगणी


 तुकडा काळजाचा

लेक माझी लाडाची

आवडती बापाची

सोनकळी


वाढली लाडात

ताई आवडती भावंडांची

आजी-आजोबांची

साय


येऊन ठेपला

क्षण सासरी जाण्याचा

नयनी अश्रु

ओघळले


कशी सावरु

धीर देऊ स्वतःला 

हुंदका बापाचा 

आवरेना


आशीर्वाद तुजला

संसार तुझा सुखाचा

यश किर्तीचा

फुलावा



Rate this content
Log in