लेक
लेक
लाखात एक माझी लेक आहे देखणी
तिला पाहुन चालती रोज माझी लेखनी
लक्ष्मी म्हनून आली माझ्या दारात
सोन्याच्या पावलांनी हिंडती ती घरात
माझेच प्रतिबिंब मी तिच्यात पाहते
तीचे नटखट अदा सारखे हसवत राहते
खाण्यात तिचा रोजच नखरा
मारावे लागते तिच्या मागे किती चक्करा
बापाची तर आहे ती काळजाचा तुकडा
जास्तच चालतो तिचा बापा जवळ नखरा
बापावर लेकीची असते अफाट माया
बाप ही झिजवतो तिच्या भविष्यासाठी काया
भावाच्या खोड्या सहज काढते
शाळेची कागद त्याची घेऊ घेऊ फाडते
दिवसभर नको ते उद्योग ती करते
सार सामान अख्या घरभर सारते
करून करून मस्ती थोडीशी दमते
हळूच येऊन माझ्या मिठीत झोपते
लेक माझी जवळ खूपच गोड दिसते
माझं संपुर्ण थकवा मी क्षणातच विसरते
प्रत्येकाच्या घरात एक लेक असावी
सुख समृद्धिने घर ते भरून दिसावी
