लेक
लेक
1 min
452
लेक माहेरचा कट्टा
लेक आठवणींचा कप्पा।
लेक अंगणी पैंजण
लेक परक्याच धन।
लेक काळीज बापाचं
लेक हळव मन आईच।
लेक माया करते आईवरी
लेक बापाची हो परी।
लेक माहेर सोडते
लेक सासर जोडते।
लेक काचेतला हिरा
लेक विसावा माहेरा।
लेक सासरी जातांना
बाबा तुटतो आतुन ।
आई सांगे बाबांना,
आहो लेक परक्याच धन
