लेक
लेक
1 min
98
स्वप्नातली परी तू, आयुष्यात उतरलीस खरी.
तूझ्या येण्या मुळे, माझ्या शब्दांचे भाव दाटले उरी.
उर माझ भरून आल, डोळ्यातलं पाणी आपोआप आटल.
दुःखाच गणित अस काय फाटल, सगळ सुख एकदाच साठल.
सुखाच्या बाबतीत तसा मी, तूझ्या पेक्षा नशीबवान.
उन्हामध्ये चालताना आता, मला लागत नाही वहान.
वहान माझी फाटकी होती, पण पुण्यवान होते पाय.
माझ्या साठी जन्म तूझा, लक्ष्मी स्वत: आली की काय.
आयुष्याच्या पाठीवरती जेव्हा, ठोकली होती मेख.
सगळच बदलून गेल तेव्हा, घरी आली होती लेक.
