STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

लेक वाचवा, लेक शिकवा

लेक वाचवा, लेक शिकवा

1 min
897

लेक शिकली, सुशिक्षित झाली

स्वातंत्र्याची दारे उघडली

तरीही आज या भूतलावर

निर्भयाची लक्तरे पडली।। १।। 


अशा निर्भया पाहून जगी

बाप म्हणे मज 'लेक'नको

कसा ठेवू तुला सुरक्षित

त्यापेक्षा तू पोटी येऊ नको।। २।। 


 दिशा बदलू जरा विचारांची

छबी असे ती झाशीच्या राणीची

नजर ओळखण्या शिकवा तिला

'सावज'करू पाहणाऱ्यांची।। ३।। 


ओळख करून द्या स्पर्शाची

भल्या आणि बुऱ्या साऱ्यांची

चिमुकली सुरक्षित राहील अापुली

द्या शिदोरी अशा शिक्षणाची।। ४।। 


बळी न पडो अन्यायाला

लेक शिकवा अशी आता

संरक्षणाचे धडे देऊनी

लेक वाचवा आपुली स्वतः।। ५।। 


Rate this content
Log in