लेक सासरला जातांना🌹
लेक सासरला जातांना🌹
लेक सासरला जातांना आई
बाबांना दोन शब्द मनोगत
छोट्या या परीला तुम्ही जिवापाड जपले।
मांडीवर थोपटून माझ्यासाठी रात्रभर जागले।
ह्याच छोट्या परीच्या पंखात
संस्काराचे बळ देऊन तिची पाठवणी करणार।
मला पाठवणार पण सोबत
तुमच्या, माझ्या आठवणी उरणार।
बाबा सकाळी उठ ग बाळा,
हाक मारणारे तुम्ही आता स्वतःलाच सावरणार।
स्वतःचे हुंदके गिळुन
आई हळवी आहे म्हणून ,वरतून तिलाच रागावणार।
माझी देखील आता तीच अवस्था होणार आहे।
पण ,तुमचं हे गुणी बाळ
तुमच्यासाठी समजूतदारपणाने वागणार आहे।
नका काळजी करू आई बाबा
मी आईकडून शिकलेले संस्कार
आणि तुमच्याकडून शिकलेला
जीवनाचा संघर्ष एवढीच शिदोरी
तुमच्याकडून घेऊन जाईन।
मी तर सुखात राहीलच पण
तुम्हा दोघांना नेहमी आनंदात ठेवीन
दोघांना नेहमी आनंदात ठेवीन
