STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

लेक ( कविता )

लेक ( कविता )

1 min
422

लेकीनं मांडला

भातुकलीचा खेळ

खेळताना त्यातच

जातो तीचा वेळ....१


सांगा बरं बाबा

" तुम्हाला काय देवू करून ? "

झटपट हातात

ताट असते भरून...२


खोटया खोट्या भांडयांशी

खरे खरे खेळते

थोडा वेळ दम धरा

साऱ्यांना सांगत सुटते...३


प्रत्येकाच्या फर्माईश

ताटात तेच ते वाढते

पोटभर जेवा बरं

आग्रहाणं ती म्हणते.....४


सर्वजण घरातले असे

खुश तिच्यावर होतात

गोड गोड पापा तिच्या

पहा गालाचा घेतात....५



साहित्याला गुण द्या
लॉग इन