लेक चालली सासरला !!
लेक चालली सासरला !!
1 min
490
पहाटेचा तो आरव
जाग आणीते मनाला
आसवांच्या ह्या ओघात माझी
लेक चालली सासरला !!धृ!!
सुख ही देत आली
सुख ही देत जाणार
माहेर असो वा सासर
पण खोट्यास कधी न जुमाणणार !!१!!
ओलांडुनी माप माहेरचं
सर्व सुख हातासरसे मिळवत राहणार
दुःखी न ठेवता आईवडिलांना
सदैव त्यांची ती ऋणी राहणार !!२!!
खेळ खेळता अंगणी
मन जाई आनंदुनि
माहेरची आठवण ही मनात
ठेऊन लेक चालली सासरी !!३!!
समीप आली वेळ ही जाण्यास
माहेरातुनी सासरी
म्हणून ही काशाविशी
माहेरची याद ताजी !!४!!
