Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

लावण्याची खाणी

लावण्याची खाणी

1 min
213


पहिली वहिली भेट आपली आल्या दाटून अमृतवेल आठवणी

मन धावतेय भूतकाळात तूच माझी सखी लावण्याची खाणी


स्मरते ती पहिली भेट आपुली सांज काहीशी झुकलेली

तार्‍यांनी बहरलेली नभांगणी तूच माझी सखी लावण्य खाणी


तू दबक्या पावलांनी आलीस तुझ्या पैंजणांच्या आवाजाने दगावलीस

तुझ्या येण्याची खबर मिळाली मनीतूच माझी सखी लावण्याची खाणी


काय बोलावे तुला कळत नव्हते मला तरी कुठ काय उमजत होते

आपण होतो भातुकलीतील राजा राणीतूच माझी सखी लावण्याची खाणी


काही न बोलणारी, नजरेतून सांगणारी अशा कितीतरी तुझ्या आठवणी

रमतो मी त्या परत परत स्मरूनी तूच माझी सखी लावण्याची खाणी


स्वप्नात येणारी, झुल्यावर बसणारी प्रेमसंदेश पाठवणारी,

धुंद होणारी सखी माझी गाते गाणी तूच माझी सखी लावण्याची खाणी 


Rate this content
Log in