STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

लावणी

लावणी

2 mins
268

कसं सांगू सख्या साजना,

मला दागिन्यानं मढवा

गड जेजुरी, या खंडेरायाचं

दर्शन मला घडवा ॥धृ॥


सात जन्माचे आपण साथी

सदोदीत ठेवू एकमेकांचे हात हाती

प्रीतीच्या झुल्यावर मला झुलवा

गड जेजुरी, या खंडेरायाचं

दर्शन मला घडवा ॥१॥


मखमली पलंग हा सजवला

मदभरी स्पर्श तुझा देह हा थरथरला

हळूच घ्या बाहुपाशात, प्रेमानं भिजवा 

गड जेजुरी या खंडेरायाचं

दर्शन मला घडवा ॥२॥


कमनीय बांधा माझा काया चमकदार

पाठीवर रूळतोय चोळीचा दोर 

छानदार

पाहुनी माझ्या या ललना साजना नयनी हो साठवा

गड जेजुरी खंडेरायाचं

दर्शन मला घडवा ॥३॥


Rate this content
Log in