STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

लावणी

लावणी

1 min
318

उभा शाळू हुरड्या ला ग आला

हिच्या शेताला पाणी पाजवा

कोरस :

 हिच्या मळ्याला पाणी दाखवा 


काळी कुळ कुळीत ही जमीन

जीवापाड केलया जतन

सुपीक झालीय खतान 

इथं लगीच उगवंतया बियाणं

एकदा हिरीला इंजन बसवा 


हिच्या हिरीची गोष्ट लै न्यारी

साखरवानी पाणी गोड भारी

समद्या पिकांना येती तरतरी

पाजता पाणी रंग दिसे हिरवा 

कोरस :

 हिच्या मळ्याला पाणी दाखवा 


रंग भरलाय हिरवा ट च्च

दान पोटरीला भरल्यात गच्च

चांदण लाख लखतय रातच्च

पाखर येत्याती गोफण फिरवा

कोरस

 हिच्या मळ्याला पाणी दाखवा

 

हिरव्या पिकाची उरात धडकी

चोरा चिलटा ची नजर लै बेरकी

आपुन च करावी आपली तरक्की

खूण गाठ मारावी पक्की

वखुत आलाय बाजार दाखवा


हिच्या मळ्याला पाणी पाजवा


Rate this content
Log in