लावणी लेखन- कोरोनाग्रस्त
लावणी लेखन- कोरोनाग्रस्त
1 min
193
ग्रासलेय कोरोनाने
पाप केले मानवाने
रोग दुर्धर हा भारी
नाव याचे महामारी
साऱ्या जगालाच सतावले कसा सुटेल हा तिढा
संसर्ग टाळूनी बांधवांनो एकत्र येणंच सोडा ||धृ||
झालाय घोर आघात
करतो रोगच घात
कधी सुटेल ही पात
जीवा होई घातपात
जबाबदारीने वागुन गर्दीची सवयच मोडा
संसर्ग टाळूनी बांधवांनो एकत्र येणंच सोडा ||१||
मेले त्रासले कित्येक
रोग मेला हा जाचक
नाही लशीचा उपाय
टाळू संसर्ग पर्याय
ज्यांनी मनी न धरले झाला त्रास जाच त्यांना थोडा
संसर्ग टाळूनी बांधवांनो एकत्र येणंच सोडा ||२|
