STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

लाटा

लाटा

1 min
204

लाटांमागुनिया लाटा येती

 सागराचे चक्र अविरत

जरी फुटल्या किना-यावरती

किनारा कुरवाळे प्रेमरत


ओहोटी भरती निसर्गचक्रचि

जाणे सागर मनीमानसी

ओहोटीला जरी आत जाई

भरतीला वेगे धावे भेटीसी


लाटांवरी लाटा उच्छ्रुंखल

आनंद मिळे अतुलनीय

डौलाने डुलती लाटांसवे

यौवनलीला अवर्णनीय


सूर्य चंद्र अन् सागरलाटा

जगतात नेमस्त असती

चंद्रकलांचे नाते जवळचे

उचंबळोनी नभी झेप घेती


साहित्याला गुण द्या
लॉग इन