लागली ओढ पावसाची
लागली ओढ पावसाची
लागली ओढ पावसाची त्या राबणा ऱ्या शेतकऱ्याना
उन्हाची झळ सोसून पेरणी करणाऱ्या हातांना
लागली ओढ पावसाची व्याकुळ झालेल्या त्या पक्ष्यांना
पंखांखाली निजणाऱ्या त्या इवल्याशा पिलांना
लागली ओढ पावसाची सर्वांना सावली देणाऱ्या झाडांना
सुकून गेलेली पाने घेऊन डुलणाऱ्या त्या वेलींना
लागली ओढ पावसाची भिजू इच्छिणाऱ्या चिमुकल्यांना
डबक्यात खेळून झाल्यावर त्यातच चालणाऱ्या कागदाच्या होड्यांना
लागली ओढ पावसाची एकाच छत्रीत भिजणाऱ्या प्रेमींना
पावसाच्या थेंबांत अश्रू लपवणाऱ्या र्प्रेमभंगी जिवांना
लागली ओढ पावसाची जणू सर्वच प्राणिमात्रांना
नवीन काहितरी लिहू इच्छिणाऱ्या माझ्यासारख्याच अनेक कवींना