लाॅकङाऊन मध्ये आठवणारी आई
लाॅकङाऊन मध्ये आठवणारी आई
1 min
22.4K
लाॅकङाऊन आहे मला सलते
कितीही समजुन घातली तरी
मन सारखे माहेरी पळते
कस सांगू आई तुझी
आठवण मला किती छळते
सकाळी सकाळी कापरया हाताने
तुळशीला पाणी घालणारी तु
मला पाठमोरी दिसते
कस सांगू आई तुझी
आठवण मला किती छळते
दिवस असो वा रात्र
सगळयांची तु काळजी घेते
ओझी संसाराची एकटीच ओढते
कस सांगू आई तुझी
आठवण मला किती छळते
सणावाराला किती लगबग चालते
आग्रह करुन तु जेवायला वाढते
सगळयांची आवङ तुला छान कळते
कस सांगू आई तुझी
आठवण मला किती छळते
कधी तुला भेटते असे आता वाटते
एकेक दिवस कसाबसा मी काढते
मुर्ती तुझी ती ङोळयात अशी साठते
कस सांगू आई तुझी
आठवण मला किती छळते..
