लाॅकडाऊन
लाॅकडाऊन
1 min
303
वाईट वाटले ऐकून त्याचे बोल
देवा आतातरी त्यांंची शाळा खोल
आई म्हणते जास्त बोलू नको
चल आपण दुुुकानाचेे शटर खोलूू
तेवढाच हातभार लागेल संसाराला
दुसरे कोण आहे आपल्या आधाराला
लहान वयातच अंंगावर जबाबदारी पडली
कोवळी मनंं कसे कोमेेेजून चालली
ग्राहकातच वेळ जातो सारा,
पण अभ्यासाचे वाजूू लागले बारा
मोकळीक मिळाली साऱ्यांंना जगात
प्रवेश बंंदी फक्त मुलानांच वर्गात
वाईट वाटले ऐकून त्याचे बोल
देवा! आतातरी त्यांची शाळा खोल.
