लाडू
लाडू
1 min
297
लाडू गोड असो की कडू
लाडू लाडूच असतो
जसा स्वार्थी हा स्वार्थीच असतो
मित्र असो की शत्रू असो
निःस्वार्थी लाडू घट्ट असतात
ते काही केल्या फुटत नसतात
स्वार्थी लाडू ठिसूळ असतात
ते कधी टिकत नसतात
आज बागेत मुले खेळताना दिसले
वाळूचे लाडू आनंदात घडताना पाहिले
तोही लाडू हात लावून पाहिला
कठीण बराच मला जाणवला
आत्मशक्ती त्यात मला दिसली
म्हटले ही रे देवा किमया कसली
काठिण्य भरलेली मला जाणवली
आणि आश्चर्याची एक लहर उठली..!
