लाडकी लेक !!
लाडकी लेक !!
1 min
200
काळजाचा तुकडा तू ,
माझा जीव की प्राण....
नको ग होऊ मोठी ,
तू जाशील खुप लांब !!
माहित आहे मला ,
तुझे विश्व खुप छान....
कसा देवू दुजोरा ?
मला उरले नाही भान !!
होशील तू नजरेआड ,
काय उरेल माझ्या हाती ?
लग्न करून का बरं ?
लेक जाते दूर देशी !!
