लाडकी लेक
लाडकी लेक
तूझ्या येण्याने, अजून आनंद झाला.
अलगत जबाबदारीचा, हसरा शहारा आला.
फिरतील तूझे पाय घरात, दुडूदुडू शर्यतीचा प्रवास.
सगळा थकवा निघून जाई, जेव्हा तुला पाहून घेतो श्वास.
बोलण्याची घाई तुझी, आपोआप निशब्द मी होईन.
हात माझा सरसावताच, कुशीत माझ्या येईन.
रडणे हसणे राग नखरा, सगळे हट्ट पूरवीण.
तूझ्या सवेत तूझ्याच सोबत, बालपण पुन्हा मिरवीन.
लग्ना नंतर तूझ्या, जरी माझ्या जवळ नसशील.
झालो कितीही म्हातारा, तरी तू लहानच असशील.
तुला झालेला प्रत्येक आनंद, मला सुख देऊन जातो.
नातं आपल तसच आहे, फक्त दिवसा मागून दिवस येतो.
