कवितेतील भावना
कवितेतील भावना
1 min
221
सत्याची बाजू मांडणाऱ्या
असतात कवितेतील भावना
हृदयात घर करणार्या
जोडतात मना- मनांना
व्यक्तिमत्वावर लिहिणाऱ्या
पशुपक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या
परखड लेखन करत
विचारांना जोडणाऱ्या
रसिक मनावर राज्य करत
मते मतांतरे मांडणाऱ्या
विषयाला धरून लिहित
जगा सुविचार सांगणाऱ्या
कौटुंबिक, सामाजिक
शैक्षणिक, अध्यात्मिक
जपाव्यात कवितेतील भावना
कारण असतात मौलिक
