कवितेच्या गावी भेटलेली मैत्रीण
कवितेच्या गावी भेटलेली मैत्रीण
एक अनोळखी मैत्रीण,
भेटली कवितेच्या गावी,
दिवसभरातला वेळ थोडा का होईना,
पण केला तिच्या नावी...
मनाने आहे खूपच भारी,
पण "रहस्यमय" आहे तिची स्वारी,
बोलते तर अशी वेडी,
जणू सोडवण्यासाठी देतेय कोडी...
उपमा एक छानशी तिला दिली,
तर तिने त्याचीही,
कवितारूपी फोडणी घातली,
पण ती फोडणी मस्तच वाटली...
मेसेजवर होतंय बोलणं,
भेटली तर अजूनही नाही,
भेटायचं सोडाच कशी दिसते,
हे पण मला माहिती नाही...
दिसण्यापाशी काय आहे,
असणं हे महत्त्वाचे...
एकमेकाची मनं सांभाळून,
मैत्रिणी बनून राहणं महत्त्वाचे...
असेल नशिबात तर,
कधी ना कधी भेट नक्कीच होईल,
आधीपासूनच सांगतेय...
भेटशील तेव्हा...
तुझी फिरकी मात्र घेईल....
