STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

कवितेचा सोस!!!

कवितेचा सोस!!!

1 min
225

कोठून अवदसा सुचली मला

तुझ्या प्रेमात मी पडलो

पहिल्याच भेटी साठी खुळे

कवितेची भीक मागू लागलो...


कवितेत काय डोंबल प्रेम असतं

हे तुला कोण ग सांगणार..?

म्हटलं तुझ्या हट्टासाठी मी आता

कवितेची भीकही कशी ग मागणार..!


हसतात सारे तर हसूदेत आता

कित्येकांनी हाच गिरवला कित्ता

सदैव प्रियसेचीच असते सत्ता

नाहीतर मग मदिरेचा नशिबी गुत्ता...!


पावला एकदाचा देव मला

चार ओळी तरी सुचल्या

पाण्यात पडल्यागत सखे मी

दोन चार ओळी बघ खरडल्या...


आता नको कधी हट्ट असा करू

कितीदा सांग दुसऱ्याचे पाय धरू

त्यापेक्षा आपण प्रकाशन संस्थाच काढू

कवितेलाच कायमची पुस्तकात गाढू...


सांग आतातरी डोळ्यांचे पारणे फिटले का..?

हौसेचे मनसुबे तुझ्या भागले का...?

कवितेलाच मी केले दर्यापार

म्हंटल होऊन जाऊ दे प्रेमात

         काय ते एकदा आत्ताच आरपार...!


Rate this content
Log in