"कवितेचा अभंग"
"कवितेचा अभंग"
1 min
248
सुर्यनारायणाने साद घालावी,
धरतीला जाग यावी,
निसर्गाने दवबिंदूचा साज करावा,
कोंबड्याने बाग द्यावी
कपीलेला वासराने बिलगावे,
पक्षांचा किलबिलाट व्हावा,
मंदिरात घंटेचा नाद दुमदुमावा,
अश्या नयनमनोहर वातावरणात
काव्याने जन्म घ्यावा,
तो अभंग या नावाने
जनमानसाच्या मुखात रहावा.
