कवितार्थ
कवितार्थ
कविता म्हणजे कविमनाचा आरसा,
जोपासला जातो शब्दांत भावनांचा वारसा.
कविता असते तसं बघताना छोटी,
पण असते भावपूर्ण आशयाची पेटी.
कवितेत उतरतो कधी कधी प्रेमभाव,
तर कधी प्रकटतो विरहाचा गाव.
कविता म्हणजे प्रेमळ धाग्यांची विण,
कविता म्हणजे हळव्या मनाची किणकिण.
कविता म्हणजे आहे शब्दांचा खेळ,
जिथे अबोल भावनांचा बसतो मेळ.
शब्द अंतरीचे मुके होतात जिथे,
लेखणीतून उमटती सारे इथे.
कविता कधी असते अनुभव,
तर कधी असते ती कल्पना,
जे न देखे रवि,ते ते देखे कवि,
गुंफतो शब्दांत मनीच्या खाणाखुणा
कविता म्हणजे नसतात नुसत्या ओळी,
कविता असते अनमोल शब्दांची साखळी.
कविता म्हणजे कविचे विश्व अखंड,
करि प्रयत्न सदा कधीही न पडो खंड,
प्रार्थना प्रभुचरणी आजच्या कविता दिनी,
कवितेला लाभो शुभेच्छा उदंड.
