STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

कविता..!

कविता..!

1 min
530

मर्म जाणण्याची उत्सुकता

जीवास घोर लावते

कवितेच्या प्रांतात

उगाचच ओढून घेते


सहज जाता जाता

मिळेल ते वाचावं

वाचता वाचता

सुचेल ते लिहावं


साधं सोपं गणित

हे कवितेचं असतं

उगाचच सर्वांना ते

अवघड कोड वाटत


पहायचं जाणायचं

अंतरात उतरवायच

हुळूच वेळ मिळता

ते आनंदात बाहेर काढायचं


शब्दांच्या अर्थातला

अर्थ उलगडून पहायचं

पाहता पाहता

त्याचा आनंद लुटायचं


कवितेचं देणं हे

भगवंताच कृपा छत्र असतं

त्याच्या साठी मुळी 

काही करायच नसतं


एक दिवस असा येतो

तो सर्व काही देऊन जातो

जात जाता

कवितेचं मर्म सांगून जातो


तोच दिवस आपला असतो

तो कायमचा जपायचा असतो

त्या दिवसाच्या सामर्थ्यावरच

कविता करीत जीवन जगायचं असतं..!


Rate this content
Log in