कविता
कविता
1 min
381
नको नको माझ्या मना
नको करू तडफड
किती करशी इचार
जरा गुमानं रं पड...
कसं आवरु आवरु
कसं सावरु हे मन
नाही जराशी उसंत
सदा त्याची भुणंभुणं...
त्याले कराले इचार
नाई लागे काळयेळ
चैन जिवाला या नाई
याचे चालूच रे खेळ...
झोप रातीचीही नाई
फिरं दिसा गुरगुरं
मना झोप रं जरासा
रहा शांत आणि स्थिर...
कदी वाटे माझं मले
दिलं कायले हे मन
आठवणी येती जुन्या
आसू येती डोयातून...
कसं आवरु मनाले
लई झालं सैरभैर
माझं मलेच कळना
काय त्याचं माझं वैर...
