कविता
कविता
1 min
256
कविता
तुझी कविता
माझी कविता
शब्दातील फरकांची
अर्थ साधारणतः तोच,
आपली आपणच फूलवायची,
तू वाहवा करायची,
मी वाहवा द्यायची,
तुझी माझी कविता.
समिक्षा कुणी करायची,
अलंकार, वृत्ते तपासायची
की अशीच मुक्तपणे विहरायची,
आपली कविता हृदयाकडून
हृदयाकडे सहज पोहचवायची.
