कविता
कविता
1 min
329
असेच असावे गगन निळे,
नद्यानां जल वाहते,
पक्षी उडती, आकाशी बरे,
वृक्ष लता आणि शेत हिरवे.
असेच असावे वृक्ष उंच उंच
पर्वत रांजी, सिंह वाघ,
हरिण पहा उंच उडे,
कोवळे ऊन इंद्रधनूचे,
खळे बरे.
हलका वारा,लाल पांढरे,
पिवळे फुले ,
विविध रंगी फुलपाखरे,
शेत पिके रान हिरवे,
रानी चरती गाई गुरे,
हंबरती, वासरे,
नाचरा मोर, कोकिळांचे,
आवाज बरे.
लिहीणे वाचणे,थोडे थोडे,
कवी कल्पनेत रमणे,
छान मधुर कविता माझी,
द्यावेत तिला शब्द बरे.
