STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

कविता

कविता

1 min
521

मनातील भावनांना

शब्दांची साथ मिळते

त्यातूनच सुंदर कविता

मग जन्मास येते।। १।।


साठलेल्या भावनांची

वाट मोकळी होते

स्वप्नांची गोजिरी एक

दुनिया ती सजते।। २।।


स्वप्नांच्या पलीकडेही

धाव मन घेते

क्षितीजालाही स्पर्श करून

क्षणात फिरून येते।। ३।।


आठवणींची गुंफलेली

माला ती असते

सूर नवे छेडणारी

वीणा ती असते।। ४।।


जगण्याचा खरा अर्थ

सांगणारी ती असते

मनापासून मनापर्यंत

पोहोचणारी ती असते।। ५।।


Rate this content
Log in