STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

कविता

कविता

1 min
337

शब्द शब्द मोलाचा

तो जपून बोलायाचा  

शब्द हे जादूई असती

खेळ चालतो शब्दांचा


आपलेच शब्द जपती

नाती आपली प्रेमाची 

कठोर शब्दाने तुटती

अन् भिती दुराव्याची 


शब्द वाढविती मान

शब्दच करती अपमान 

शब्द उठविती रान

वाढे शब्दाने सन्मान 


शब्दाने संवाद घडती

वादाने वाद वाढती

शब्द शब्द जोडूनच 

कविता जन्म घेती


मन हलके कराया

शब्दच साथ देती

शब्दाविन कधी ना

संवाद शक्य होती

 

राग कुणावर धरता

गोडवा सरून जाई

गोड शब्दांनी प्रेमात

भारीच गोडवा येई


कधी शब्दांनी रुसावे

कधी उगा गोड हसावे 

अनोख्या या शब्दांनी

आज कविता बनुनी यावे


Rate this content
Log in