कविता
कविता
1 min
354
आली आली ही दिवाळी
माझ्या इवल्या घरात
चार मातीच्या दिव्यांनी
सरे अंधाराची रात
टुमदार घर माझे
अंगणही इवलेसे
छान रंगांची रांगोळी
कशी शोभुनिया दिसे
दारी झुलते तोरण
छान झेंडुच्या फुलांचे
पान हिरवे आंब्याचे
अधीमधी हे मानाचे
अशा दिवाळ सणाला
असे मजा फराळाची
गोड लाडुच्या संगती
चव भारी चिवड्याची
भल्या पहाटे पहाटे
असे उटण्याने स्नान
साचलेली मरगळ
जाई क्षणात निघून
भारी मोठाली ती घरे
रोषणाई नि आरास
स्वर्ग जणू धरेवरी
आज उतरला खास
घर भरलं गोकुळ
काय आणिक हो हवं
देव्हाऱ्यात पांडुरंग
माझी मोलाची रे ठेव
