कविता वैद्यकीय श्रीगणेशा
कविता वैद्यकीय श्रीगणेशा


जा कुठल्याही डॉक्टरकडे
गळ्यात त्याच्या स्टेथस्कोप
प्रथम पाहतो छाती तपासूनी
नंतर ते पुढले होती खटाटोप(१)
वैद्यक विद्येची सुरुवात
स्टेथस्कोपनी या होते
यंत्र जादूचे गुपित आतील
डॉक्टरच्या कानात सांगते(२)
कधी छातीचे वाढती ठोके
उदरी कधी येतात कला
स्टेथस्कोप हा हिशोब देतो
आतील दुखण्याच्या सगळा(३)
रोग्याची कुंडली मांडती
डॉक्टर मग कागदावरी
देतो लिहूनी औषध गोळ्या
नंतर घेण्यासाठी घरी(४)
नाडी केव्हा तपासतात
आणि रक्तदाब मोजिती
जन्मापासून मरणोत्तरही
हेचि मोजते कादामळीज गती(५)
आजकालच्या वातावरणी
काळीज नाही थाऱ्यावरती
मनास नाही शांती कुणाच्या
आणि हार्टला ऍटॅक येती(६)
श्वास लागतो दमाही उठतो
शरीराचे या कार्य बिघडते
स्टेथस्कोपच्या मदतीने मग
इलाज करणे उलगडते(७)
साधन अद्भुत तपासणीचे
डॉक्टरला "बोलविता धनी"
कळते त्या काळीज भाषा
उपयोगी ते क्षणो क्षणी(८)