STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

कविता-सद्गुरूंनी दाखविता वाट ||

कविता-सद्गुरूंनी दाखविता वाट ||

1 min
477

                 

सद्गुरुनी दाखविता वाट

उजाडेल आता नवी पहाट .....||धृ ||


दारे मनाची होती लावलेले

चित्त ही नाही स्थिरावलेले

करावे स्मरण सद्गुरूंचे

उजाडेल आता नवी पहाट ......||१||


संसार सुखात रमुनी जातो

या सुखाचेच गोडवे गातो

घेऊन जाता मना गुरूकडे

उजाडेल आता नवी पहाट .......||२||


वीट येवो आम्हा उपभोगाचा

जावे श्री सद्गुरू कडे आता

यावा विचार मनात हा आता

उजाडेल आता नवी पहाट ........||३||


सद्गुरुनी दाखविता वाट 

उजाडेल आता नवी पहाट ......||धृ |||


Rate this content
Log in