कविता- साधेपणात सुंदरता
कविता- साधेपणात सुंदरता
1 min
488
साधेपणात असते सुंदरता
फॅशनची गरज ती नसते
नीटनेटकेपणा असावा तो
नटण्याची गरज ती नसते
सौंदर्य आणि फॅशन दोन्ही
एकमेकास पूरक असले तरी
फॅशन चा अतिरेक करण्याने
सुंदरतेस बाधा येते हो खरी
आधुनिक आहोत हे दिसाव
खटाटोप ,किती ते करतात
न शोभणारी फॅशन करून
स्वतःचे हसे करून घेतात
