कविता - प्रेरक हे सारेच
कविता - प्रेरक हे सारेच
1 min
239
इतिहासात कहाण्या
वीर, महावीर, पराक्रमी
अजेय योध्यांच्या अफाट
साहस आणि शौर्याच्या
देशरक्षणार्थ जागरूक
सैनिक तैनात सीमेवरती
उदाहरण हे प्रतिकरूप
साहस आणि शौर्याचे
बालके चिमुकली जरी
प्रसंगवधनाने जीव वाचविती
मदत करिती इतरांची
साहस नि शौर्याने
स्त्री अबला, नाही दुर्बल
कणखर मनाने ,धीटपणे
कठीण समयी लढते
साहस नि शौर्याने
