कविता म्हणजे.......
कविता म्हणजे.......
कविता म्हणजे अनुभवांच्या पुंजीतून निर्माण झालेल एक काव्य........
आपले परकेपणाच्या सान्निध्यातून निर्माण झालेल एक हास्य.......
कविता म्हणजे आयुष्यातील रसाळ गीत...
स्वतःच स्वतःवर रचलेले संगीत.....
कविता म्हणजे पाणावलेल्या डोळ्यातून निर्माण झालेल हळवं मन.....
आपल्याच विचारांतुन आपल्याला खंबीर बनवणारं स्तवन.......
कविता म्हणजे काळोखातील रस्ता दाखवणारा काजव्यांचा प्रकाश......
वाट विसरलेल्या वाटसरूसाठी एक निरभ्र आकाश....
कविता म्हणजे मनातील एक गुढ सत्य.....
मनातल्या प्रश्नांच अंतिम सत्य.....