कविता - मायमाऊली
कविता - मायमाऊली
1 min
326
देते सदाच सुखाची सावली
एक ती हो माय माऊली
लेकरु दिसते खुशीत
असते तेआईच्या कुशीत
आजारी लेकरू राही पडून
माय काढी रात्र उशाशी जागून
निर्धास्त असते बाळ घरात
असते ते आईच्या छायेत
मांडीवर घेते बाळास आई
झोपविते त्यास गाऊनी अंगाई
