कविता माझी, आजची
कविता माझी, आजची
1 min
309
व्हॅलेन्टाइन डे म्हणजे, प्रेम दिवस
पाश्चात्यीकरणाचा हा, जसा कळस
प्रेम तर निर्गुण निराकाराची, अनुभूती
आपल्या मनोभावनांची, निर्विकार प्रिती
दिवस-तारखांना, का जाणावे हे बंधन
ईश्वर निर्मित, अंतरंगात होतेय सतत मंथन
जग घडामोडींशी नसतो याचा, काही संधन
माझं तुझं संपून एकत्वाशी, करते हे चिंतन
श्वास-प्रश्वासाची गती जशी, एका लयात
साद-प्रतिसादाची जाग तशी, समन्वयात
आचार विचाराचं गुढ, गळून पाडतो हा एक बंध
नाही गाठीचं गुंथन, जडवतो फकस्त स्नेहाचं बंध
