कविता- गोड बाहुली ही
कविता- गोड बाहुली ही
1 min
652
गोड बाहुली ही
आजी-आबांची
सुंदरशी परी ही
आई-बाबांची हो..
घरभर फिरते ही
सर्वांच्या सोबत
मस्त खेळते ही
सुंदर गोड परी
दादू लाड करतो
खूप खाऊ आणतो
तो येतो जेव्हा घरी
खुश असते ही परी
घरा घरात असावी
एक अशी गोड परी
मुलगी असते हो
घराची शोभा खरी
