कविता - गौरवशाली साक्षीदार
कविता - गौरवशाली साक्षीदार
1 min
359
इतिहासातील सुवर्णपाने
आहेत हे देशभरात असलेले
विविध दुर्ग, गड आणि किल्ले
गौरवशाली साक्षीदार सगळे
वेगवेगळ्या राजवटी अन
अनेक राजवंश इथे नांदले
शूरवीर, पराक्रमी महाराजे
यांची स्मारके गड आणि किल्ले
गड आणि किल्ले यांचे महत्व
शिवबानी आधीच जाणले
महाराष्ट्र राज्य त्यांनी खरे
गड ,किल्ल्यातून राखले
भुईकोट, सागरी, जमिनीवरचे
असे सारेच बहुमोल किल्ले
आज ही सांगती कहाण्या
ताठ मानेने हे गड आणि किल्ले
