कविराजाची झोळी...!
कविराजाची झोळी...!
कवीची झोळी मला भेटली
भरगच्च भरलेली दिसली
मला हाव सुटली
म्हणून हातात पटकन घेतली....
ती लाजली शरमली
तोंड सुद्धा उघडेनाशी झाली
मला कौतुक वाटले,म्हंटले
लाजू नको बाई मी काही परका नाही...
तशी ती जरा सावरली
एक एक अक्षर ,शब्द बाहेर टाकू लागली
अक्षरांचे शब्द होता,शब्दांच्या ओळीं
आपोआप बाहेर पडू लागल्या...
मी पाहू लागलो ,वाचू लागलो
साक्षात सरस्वतीचे देर्शन घेऊ लागलो
मनसोक्त काव्यानंद मिळाला
जीव मोठा सुखावला...
सरते शेवटी एक कविता
लाजत लाजत बाहेर पडली
त्या कवितेने माझी झोप उडवली
लक्ष्मी स्तवन वाचून तृषा तृप्त झाली....
लक्ष्मी सुद्धा वाचून प्रसन्न झाली
म्हणाली कवि राजा पोतडीत तुझ्या
पहा ना ,मला रे कोठे जागा आहे..?
शब्द सामर्थ्यानेच झोळी पूर्ण तुझीभरली आहे...
कळले मला ऐकून मर्म सारे
सरस्वतीलाच जागा झोळीत नव्हती
सर्व डोक्यात घेऊन फिरण्याची वेळ
त्या कविराजावर आली होती....!
