STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

कविमन...!

कविमन...!

1 min
195

कवितेतून मी भावना व्यक्त करतो

कोणास दुखावणे हा हेतू नव्हे

समजून घेणे जीवनास एकदा

ध्यास माझ्या हा मनी सदा असे


चूक भूल कविस सर्व माफ असावे

त्याच्या सम एकदातरी जीवन दिसावे

खटाटोप हा सुखी जीवन जगण्याचा अन

आनंद हसत मुखाने सर्वांना देण्याचा


कवी म्हणे ती पूर्व नव्हे 

पण जे न पाहे रवी ते पाहे कवी हे सत्य खरे

कवी मनाच्या भाव भावनांचे

दर्शन होता चुटकी सरशी दुःख दूर सरे....!!!



Rate this content
Log in