कवी जागा होतो
कवी जागा होतो
बघता अन्याय समाजातील
माझ्यातील कवी जागा होतो,
फोडण्या त्या अन्यायाला वाचा
विचारांचे काव्यासुमन वाहतो!१!
बघता कोणाला दुखी
माझ्यातील कवी जागा होतो,
करण्या आनंदी त्याला
स्वतः विदूषक होऊन राहतो!२!
बघता प्रेम तुझ्या नजरेतल
माझ्यातील कवी जागा होतो,
जपण्या त्या प्रेमाचे पावित्र्य
आपले सर्वस्व अर्पून देतो!३!
बघता कोणी सुखी
माझ्यातील कवी जागा होतो,
त्यांच्या आनंदात स्वतःचे
जीवन शोधू पाहतो!४!
बघता समाजातील वासनेचे भूत
माझ्यातील कवी जागा होतो,
अचारून सद्विचार जीवनात
दैवी भातृभाव ची शिकवण देतो!५!
म्हणता कोणी मजला आपले
माझ्यातील कवी जागा होतो,
जपन्या नात्यातील आपलेपण
त्याचाच होऊन जातो!६!
