कवि नारायण सुर्वे
कवि नारायण सुर्वे
अनाथ मुल जन्मदात्रीने सोडलेले
काशीबाई व गंगारामांनी पदरी घेतले
चार वर्ग शिकवीले
स्वबळावर पुढे शिकले
ऐसे ते नारायण सुर्वे झाले
कामगार आहे मी तडपती
तलवार आहे
असा ज्यांचा बाणा
सारस्वतांशी निर्भय
लढण्याची तयारी ठेवणारा
काल मार्क्सचा सच्चा दोस्त
मार्क्सवादी कम्युनिस्ट
हाडाचा हा कामगार
सच्चा दिलवाला नारायण सुर्वे
कविता ज्यांची क्रांतिकारी
दलित शोषितांचे प्रश्न मांडणारी
परिवर्तनाचा मार्ग दाखविणारी
कामगार व्यथा धारिणी
कधी उग्र आंदोलन करणारी
कधी शांत अस्वस्थता पेरणारी
जगने शिकवीणारी
मनाचा वेध घेणारी
कवीमनाला भावनारी
भावार्थाला कवेत घेणारी
सुर्वेसम कवी नाही हे सांगणारी
