कवडसा
कवडसा
1 min
495
संधीप्रकाशी मंद गारवा
अस्तआंचलीचा धुंद पारवा
जाई जुई ह्या उमलत येती
केका मोराच्या साद घालती
जर्द केतकीचा गन्ध बरवा
अवघे गोधन घरी परतती
सुवर्ण गोधुळ चरी पसरती
लहान पाडसे मधे हंबरती
डोईवर कडवळ गच्च हिरवा
कोणी अभिसरीका तीची गडबड
तरुस्थळी ती जाण्याची धडपड
केसात गुंफला सुगंधी मारवा
संधी प्रकाशी त्या गुलाबी हवा
