कवचकुंडलं
कवचकुंडलं
1 min
204
आईची वेडी माया, बापाची डोळस शिस्त,
म्हणून त्यांना कठोर म्हणणं आहे का रास्त?
आईची मायेची पाखर, बापावर जबाबदारीचा जोखड,
मिळून मायबाप बनवती जीवन आपले सुघड.
कर्णाला आईनं झिडकारलं, बापानं दिली कवचकुंडलं,
जगात बापाचं गाऱ्हाणं कधी कोणी आहे मांडलं?
आईची थोरवी निःसंशय, पण बापावर का अन्याय?
रात्रंदिन कष्टणाऱ्या जीवाला जरातरी द्या न्याय!
