क्वारंन्टाईनमुळे...
क्वारंन्टाईनमुळे...
क्वारंन्टाईनमुळे का असेना
लोकं आपल्या घराकडे निघाली..
तर कधी कोणाचं रंगाकडे लक्ष गेलं
तर पाऊले परत जुन्या दिवासाकडे वळाली..
क्वारंन्टाईनमुळे का होईना गायब
झालेली पाखरं परत पहिल्या सारखी दिसू लागली..
तर कधी कोणाचं लक्ष त्या कोपऱ्यात
बसलेल्या ब्याट बॉल कडे आणि मुले ही खेळू लागली..
क्वारंन्टाईनमुळे का होईना माणसे
गेलेल्या त्या वेळेत रमु लागली..
काही काळासाठी का होईना भ्रमण यंत्र
सोडुन आपापल्या परीने स्वतः मध्ये रमली..
क्वारंन्टाईनमुळे का होईना काहींचे लक्ष
किचन कडे ही वळु लागले..
वेळ काय जाता जाईना म्हणून कोणी
जिभेचे चोचले पुरवू लागले...
क्वारंन्टाईनमुळे का होईना
इडियट बॉक्स ही शहाणा होऊ लागला..
त्याच बॉक्सने लहानपणीचे दिवस ही परत
आणले प्रत्येक जण आठवणी हसवून हसु लागला..
क्वारंन्टाईनमुळे का होईना माणसांना
घराची किंमत कळाली..
जिथे आपण राहतो तेच घर सुरक्षित आहे
याची आता सगळ्यांना खात्री पटली...
क्वारंन्टाईनमुळे का होईना माणसे
आता आपल्याला घरीच थांबली...
घरचा वेळ हीच खरी संपत्ती
याची खात्री सगळ्यांना पटली..
