कुटुंबाची सवारी...
कुटुंबाची सवारी...
सुट्टीची असतें काही गोष्टाचं न्यारी
त्या दिवशी सगळे करतात तयारी
जातात फिरायला अदभूत ठिकाण सारी
मौज मजा करतात एकदम भारी
सर्व कुटुंब येत एकत्र दरबारी
बॅगा बांधून निघते कुटुंबाची सवारी
करत थोडी मजा अन थोडी मारामारी
गप्पा गोष्टी करत ठिकाण गाठतात अलवारी
खरंच फिरायला जाण्याची गोष्टच प्यारी
विसरून कुटुंबातले सगळे मतभेद साक्षीदारी
थोडं रुसत थोडं झगडत वारंवारी
पण मजा करायला निघतात सगळे धुवाधारी
घेऊन सोबतच मस्त पदार्थांची शिदोरी
नाचत गात पोहचतात तिथे सारी
लहानही करतात मदत बनून कामगारी
मोठे देतात आदेश बनून सल्लेगारी
खरंच अश्या ट्रिपची गोष्टच अलंकारी
कितीही मजा केली तरी मन नाही थकत सारी
कुटुंबासोबतचा काही आनंदाच असतो भारी
आणि तो आनंद मिळतो घेऊन कुटुंबाची सवारी.
